14 एप्रिल रोजी 501 विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र

14 एप्रिल रोजी 501 विद्यार्थ्यांना मिळणार
ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र

         वाशिम, दि. 06 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन 6 ते 16 एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. या सामाजिक समता कार्यक्रमाचे औचित्य साधून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनी 14 एप्रिल रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमच्या वतीने जिल्हयातील 501 विद्यार्थ्यांना ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इयत्ता 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन प्राप्त करुन घ्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी कळविले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे