नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास सुरुवात
नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास सुरुवात
वाशिम दि.१२ (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा वर्ग 6 वी करीता 30 एप्रिल 2022 रोजी जिल्हयातील 7 केंद्रावर होणार आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन पध्दतीने काढण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेशपत्र काढण्यासाठी https://cbseitms.nic.in/?AspxAutoDetectCookiesSupport=1 या संकेतस्थळावरून रजिस्ट्रेशन क्रमांक व विद्यार्थ्यांची जन्मतारीख टाकून प्रवेशपत्र काढता येईल. प्रवेशपत्र काढण्यास काही तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यास जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. तरी सर्व पालकांना विद्यार्थ्याना व शिक्षकांना प्रवेश परिक्षेचे प्रवेशपत्र लवकरात लवकर ऑनलाईन पध्दतीने डाउनलोड करुन घ्यावेत. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे
*******
Comments
Post a Comment