अन्न व्यावसायिकांनी फोस्कॉस प्रणालीवर मोबाईल क्रमांक व इ मेल आय डी अद्यावत करावे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन


अन्न व्यावसायिकांनी फोस्कॉस प्रणालीवर मोबाईल क्रमांक व इ मेल आय डी अद्यावत करावे
 
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

वाशिम दि१२(जिमाका )मागील काही वर्षापासून सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दिले जातात.बऱ्याच वेळा ऑनलाईन अर्ज करताना मोबाईल क्रमांक व इ मेल आय डी हा स्वतः चा न देता इतर व्यक्तींचा दिलेला असतो. काही वेळा मोबाईल क्रमांक व मेल आय डी बदललेला असतो.अशा परिस्थितीत प्रशासन व अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांनी पाठवलेल्या सूचना, नोटीस, नोटिफिकेशन व्यापाऱ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कायदेशीर पेच उद्भवतो. तसेच कायद्यात व नियमात झालेले बदल व नवीन तरतुदी यांची माहिती व्यापाऱ्यांना मिळत नाही. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व मेल आय डी अद्यावत करून घ्यावेत. यासाठी अन्न व औषध प्रशासन अकोला कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा.अर्जासोबत परवाना /नोंदणी प्रमाणपत्राची व आधार कार्डची प्रत जोडावी.अन्न व्यावसायिकांचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर त्वरित त्यांची माहिती अद्यावत करण्यात येईल, त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे