फलोत्पादन विकास अभियान व कृषि विकास योजना महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित
- Get link
- X
- Other Apps
फलोत्पादन विकास अभियान व कृषि विकास योजना
महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित
वाशिम, दि. 12 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षी महाडीबीटी पोर्टलवर ड्रॅगन फ्रुट, मसाला पीके, फुलपिके लागवड, मशरूम उत्पादन प्रकल्प, जून्या फळबागांचे पुनरुज्जीवन (संत्रा), सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह/ शेडनेट हाऊस, हरितगृहातील भाजीपाला, फुलपिके लागवड, प्लॅस्टिक मल्चिंग, मधुमक्षिका वसाहत, मधुमक्षिका संच वाटप, ट्रॅक्टर (२० अश्व शक्ती पर्यंत) पावर टिलर ८ एचपी पेक्षा कमी, पावर टिलर ८ एच पी पेक्षा जास्त, जमिन सुधारणा/ मशागत उपकरणे, पॅक हाऊस, शित खोली, शितगृह, रायपनिंग चेंबर, रेफर व्हॅन, पूर्व शितकरण गृह, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फिरते विक्री केंद्र कांदाचाळा, भाजीपाला रोपवाटीका इत्यादी बाबीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे कृषि सहायक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment