4 एप्रिलपर्यंत पोषण पंधरवाडा



4 एप्रिलपर्यंत पोषण पंधरवाडा 

वाशिमदि. 01 (जिमाका) जिल्हयात २१ मार्च ते ४ एप्रिल  दरम्यान पोषण पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. या पोषण पंधरवाडा अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील खुजे किंवा बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषण, रक्तक्षय, जन्मतः कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण शोध घेणे, अॅनेमिया प्रतिबंध आणि व्यवस्थापन, माता व बालकांचे आरोग्य सदृढ राहण्याकरीता स्थानिक व पारंपारीक आहाराचा नियमीत भोजनात वापर करण्यासाठी अंगणवाडी व ग्रामपंचायतस्तरावर महिला मेळावे बचत गटाच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये आहार व पौष्टीक आहाराची पाककृती प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. तसेच महिलांना पाण्याचे महत्व पटवून देण्याकरीता जनजागृती सुध्दा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना, गरोदर महिला व स्तनदा माता यांना देखील आरोग्यविषयक संदर्भ सेवांचा सुध्दा लाभ देण्यात येणार आहे.

               या पोषण पंधरवाडा अभियानाच्या अनुषंगाने जिल्हातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये व शासकीय इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींगची कामे करण्यात येणार आहे. या पंधरवाडयामध्ये जिल्हातील अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागाच्या माध्यमातुन सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामधुन अतितीव्र व तिव्र कुपोषीत बालकांची माहिती मिळेल. त्या बालकांना पोष्टिक आहार व विशिष्ट प्रकारचा आहार, औषधी व वैदयकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार आहे.

               तरी जिल्हयातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेमार्फत करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे