जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष स्थापित शेतकरी,कृषी निविष्ठा विक्रेते व कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या अडचणींची घेणार दखल

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष स्थापित

शेतकरी,कृषी निविष्ठा विक्रेते व कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या अडचणींची घेणार दखल
 
वाशिम दि.५ (जिमाका) जिल्ह्यातील शेतकरी,कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेगळ्या अडचणी येतात. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत कमी असल्याने खरीप हंगाम २०२२ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकाबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण करण्यासाठी तसेच निविष्ठांचा काळाबाजार रोखण्यासाठी,त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियमित करण्याकरिता  जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
          बियाणे,खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा. 
 या कक्षाकरिता पुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच तक्रार नोंदविण्यासाठी adozpwashim@gmail.com या ई-मेलवर नोंदवता येईल. जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष पुढील प्रमाणे. कृषी उपसंचालक एन.आर. ठोंबरे(९४२१९३६६९१), कृषी सहाय्यक डी.पी आरू (९४०४२५२६७९)  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,मोहिम अधिकारी सी.पी.भागडे (८८०५८१०५१८) ग्राम विकास अधिकारी ,एस के इंगळे (९७६३२०२२८५) कृषी विभाग जिल्हा परिषद. नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी नियंत्रण कक्षात उपस्थित राहून कामकाज करावे.
        बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता पुरवठया संबंधित आलेल्या अडचणी व तक्रारीची रजिस्टरमध्ये विहीत प्रपत्रात माहिती नोंदविण्यात यावी.संबंधित  तक्रारदाराचे नाव,भ्रमणध्वनी क्रमांक व तक्रारीच्या अडचणीची संक्षिप्त नोंद घ्यावी.
        प्राप्त तक्रारी ज्या कार्यालयाशी संबंधित आहे त्या कार्यालयास तक्रारदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व तक्रारीचा तपशील पुढील कार्यवाहीसाठी तात्काळ पाठविण्यात यावा. बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंबंधी तक्रारदाराच्या अडचणीच्या निराकरणासाठी भ्रमणध्वनी/दूरध्वनी, ई-मेल व व्हाट्सआप इत्यादी माध्यमांचा वापर करावा.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे