सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमानिमित्त
ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर
वाशिम, दि.८ (जिमाका) :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने ६ ते १६ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन , नालंदानगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
****
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment