*जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित*अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

*जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित*

अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

वाशिम,दि.२३ (जिमाका) जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांना राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन आज २३ नोव्हेंबर रोजी राजे वाकाटक सभागृहात करून अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन श्रीमती बुवनेश्वरी यांचे अभिनंदन करण्यात आले.
  
       राज्यातील बालकांचा सर्वांगीण विकास व बाल हक्क संरक्षण,सुरक्षा आणि आरोग्य इत्यादि महत्वपूर्ण विषयावर प्रशासकीय यंत्रणा म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिला व बाल विकास विभाग,बाल हक्क संरक्षण आयोग,सी.सी.डी.टी.संस्था व युनिसेफ यांच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांना राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या सत्कार पर अभिनंदन कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे,जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती सुनीता आंबरे,वाशिम
उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,जिल्हा उपनिबंधक  दिग्विजय राठोड,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे,वाशिम तहसीलदार श्री.पळसकर,अधिक्षक राहुल वानखडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व धर्मराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
  
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी यावेळी सांगितले की,बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,महिला व बाल विकास विभाग,पोलिस यंत्रणा व पंचायत विभाग यांचेवर जबाबदारी देऊन जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी गांव बाल संरक्षण समिती,तालुका बाल संरक्षण समिती,लग्न सेवा पूरविणारे लग्न मंडप,डीजे,भटजी,अंगणवाडी सेविका यांची बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या विषयावर कार्यशाळा तसेच प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असताना कार्य करण्यात आले आहे.
  
 वाशिम जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या होऊ नये यासाठी येणाऱ्या वर्षामध्ये सर्व यंत्रणाच्या सहायाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येतील.अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.प्रास्ताविक श्री. देवरे यांनी केले. यावेळी अव्वल कारकून गजानन उगले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय,महिला व बाल कल्याण अधिकारी कार्यालयातील तसेच इतरही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे