जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने संविधान दिन साजरा
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने संविधान दिन साजरा
वाशिम दि.२६ (जिमाका) भारतीय संविधान दिनानिमित्त आज २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रैलीची सुरुवात करून पाटणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असे वाशिम शहरामध्ये रैलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशआर.पी.पांडे यांनी रैलीला हिरवी झेंडी दाखवून रैलीचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला व्हि.ए.टेकवानी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायिक अधिकारी,विधीज्ञ संघाचे अध्यक्ष,सदस्य विधीज्ञ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी,विधी स्वयंसेवक,पोलीस कर्मचारी, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग - समाज कल्याण कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी,नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ व नेहरू युवा केंद्र वाशिम,नर्सिंग कॉलेज,मातोश्री गोटे महाविद्यालय,येथील विद्यार्थी, शिक्षक वृंद,रासेयो पथक,हाँमगार्ड कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड पथक, वस्तीगृहाचे विद्यार्थी - विद्यार्थिनी, नागरिक यांची उपस्थिती होती. यावेळी लोककलावंत यांनी लोकगीते तसेच पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली.
Comments
Post a Comment