8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान* *माविमच्या बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री*
*8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान*
*माविमच्या बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री*
वाशिम, दि. 07 (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या निमित्ताने, विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशीम येथे बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे.
या प्रदर्शनामध्ये ग्राहकांना महिला बचतगटांनी तयार केलेले उत्पादने मिळतील. रासायनिक रंग विरहीत, कुठल्याच प्रकारचे भेसळ नसलेले स्वादिष्ट उत्पादने उपलब्ध होणार आहे. या उत्पादनामध्ये प्रामुख्याने शोभीवंत वस्तू, मायक्रमच्या शोभीवंत वस्तू,ज्वेलरी, मातीपासून बनविलेल्या वस्तू, झाडू, फडा, तसेच खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ यामध्ये आवळयाचे विविध पदार्थ, तयार केलेले ढोकला पीठ, विविध प्रकारचे सुगंधी मसाले, विविध लोणचे,पापड,पापड मसाले,गोडंबी पॉपकॉन,विविध प्रकारचे दिवे, दिवाळीचा फराळ,दिवाळीकरीता पुजेचे साहित्य, रांगोळी, विविध प्रकारचे तृणधान्य, कडधान्य व सर्व प्रकारच्या डाळी येथे विक्रीस उपलब्ध राहणार आहे.
माविमच्या या दिवाळीनिमित्ताने आयोजित प्रदर्शनात महिलांच्या बचतगटांचे 40 स्टॉल राहणार आहे. 60 बचतगटांच्या महिला यामध्ये सहभागी होणार आहे. तीन दिवशीय प्रदर्शनातून बचतगटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून 10 ते 12 लक्ष रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. बचतगटातील महिलांना व्यावसायिक दृष्टीकोन मिळावा तसेच मार्केटिंगचे ज्ञान मिळावे हा प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश आहे. तज्ञांचे या प्रदर्शनात मार्गदर्शन मिळणार आहे. सामाजिक जाणीव जागृती होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी वाशिम शहरातील नागरीकांनी या प्रदर्शन व विक्रीला भेट द्यावी. असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment