समर्थ अकॅडमीत दिली**विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती*

समर्थ अकॅडमीत दिली*
*विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती*

*समर्थ अकॅडमीत दिली*
*विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती*
 
वाशिम,दि. 07 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, याकरीता आज 7 नोव्हेंबर रोजी वाशिम येथील समर्थ अकॅडमी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. 
             यावेळी श्री. टेकवाणी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती सांगून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मिळणाऱ्या मोफत विधी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
              मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी मुलांसाठी अनुकूल कायदेशिर सेवा, मुलांसाठी संरक्षण योजना, मुलांचे हक्क व सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठल जोशी यांनीसुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आशिष विभुते यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्थ अकॅडमी यांचे सहकार्य लाभले.
                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे