महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा* समाज कल्याण विभागाचे आवाहन
*महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा*
समाज कल्याण विभागाचे आवाहन
वाशिम,दि.10 (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जात,इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने,राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ति योजना व व्यावसायीक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्याना विद्यावेतन या विविध योजना राबविण्यात येतात.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबर
2023 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे.2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाचे व नुतनिकरणाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.तरी महाविद्यालय, विद्यार्थी व पालकांनी अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahadbtmahait gov in या संकेतस्थळावर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोबर 2023 पासून पोर्टल सुरु झाले आहे. तरी वरील प्रकारच्या राबविण्यात येणाऱ्या योजनेचे अर्ज भरण्यात यावे.
शिष्यवृत्ती योजनांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदणी होईल व अर्ज नोंदणीकरण मोठ्या प्रमाणात होईल याकरीता जिल्हयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाडिबीटी संकेतस्थळावर विहीत मुदतीत भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबाबत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्ती काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करावे.महाविद्यालयाच्या सूचना फलकावर व व्हॉट्सॲप ग्रुपवर सूचना देण्यात यावी.
महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत 100 टक्के निकाली काढण्यात यावे.असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment