मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा
मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी
कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा
वाशिम,दि.२० (जिमाका) मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री.संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे,वंशावळी,शैक्षणिक व महसुली पुरावे,संस्थानिकांनी दिलेल्या सनदा,राष्ट्रीय दस्तावेज इ.जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 24 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
Comments
Post a Comment