विस्फोटकांची साठवणूक व विक्रीस आळा बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक


विस्फोटकांची साठवणूक व विक्रीस  आळा बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक


वाशिम,दि.03 (जिमाका) दिवाळी सणानिमित्त बेकायदेशीपणे विस्फोटकांची साठवणूक करणे व त्याची विक्री करण्यास आळा बसावा. याकरीता जिल्हयातील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी यांना जिल्हयासाठी,उपविभागीय दंडाधिकारी,वाशिम,मंगरुळपीर व कारंजा यांना त्यांच्या उपविभागाकरीता,तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,वाशिम, मालेगांव,रिसोड,कारंजा,मंगरुळपीर व मानोरा यांना त्यांच्या तालुक्याकरीता व नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,वाशिम,मालेगांव, रिसोड,कारंजा,मंगरुळपीर आणि मानोरा यांना त्यांच्या क्षेत्राकरीता विस्फोटक अधिनियम 2008 चे नियम 128 नुसार 5 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहे.
           या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील उपविभाग व तालुक्यामध्ये नगर पालिका क्षेत्रामध्ये नगर पालिका व ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती ठरवतील,अशा खुल्या जागेत व पटांगणामध्ये फटाक्यांची दुकाने लावली जातात.तर सार्वजनिक ठिकाणी,निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री व साठवणूक केली जाणार नाही.याची दक्षता घेवून अशा ठिकाणी लावल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांची व अवैध फटाके दुकानांची तपासणी करण्यात यावी. जे परवानाधारक अटी व शर्तीचे पालन करणार नाही,अशा दोषी फटाके परवानाधारकांवर विस्फोटक नियम 2008 च्या नियम 128 नुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.असे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आदेशात नमुद केले आहे. 
                 *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे