वाशिम शहरात केली कायदेविषयक जनजागृती
वाशिम शहरात केली
कायदेविषयक जनजागृती
वाशिम,दि.१६ (जिमाका) जिल्हा विधि सेवा प्राधिकरण वाशिमच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून विधि स्वयंसेवक शाहीर उत्तम इंगोले,माधव डोंगरदिवे, राजकुमार पडघान यांनी भीमनगर, खामगाव जिन तसेच शहरातील इतर भागांमध्ये कायदेविषयक माहिती असलेले पत्रके वाटली तसेच लोकांमध्ये कायदेविषयक प्रबोधन केले.
१४ नोव्हेंबर रोजी बालक दिनाचे अनुषंगाने पाटणी चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, संतोषीमाता नगर,माहूर वेश,रविवार बाजार या ठिकाणी कायदेविषयक माहिती असलेली पत्रके वाटून कायदेविषयक जनजागृती केली.
शाहीर उत्तम इंगोले यांनी पोवाडे तसेच लोक गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.यावेळी कायदेविषयक माहिती असलेल्या पत्रकांचे वाटप करून कायदेविषयक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आला.
Comments
Post a Comment