२६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


२६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त 
कार्यक्रमाचे आयोजन 

वाशिम,दि.२५ (जिमाका)  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. भारताचे एक सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरीकास सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय,विचार अभिव्यक्ती,विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्यात आली.राज्यघटना ही २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आली.संविधानामुळे शासकीय व न्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या.त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.
       त्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी सर्व  शासकीय व निमशासकीय कार्यालये,जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगरपालिका,ग्रामपंचायती, जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात यावे.तसेच संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयात त्या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी व त्यामध्ये संविधन उद्देशिका,मुलभुत हक्क, कर्तव्ये,जबाबदा-या इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरावेत.तसेच शाळा महाविद्यालयामध्ये निबंध/भित्तीपत्रके/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.शासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधनाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने इत्यादी कार्यक्रम आयोजन करण्यात यावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे