१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त वाशिम शहरात रॅलीचे आयोजन


१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त वाशिम शहरात रॅलीचे आयोजन

वाशिम,दि.२९ (जिमाका) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने *"आता नेतृत्व व आघाडी समुदायांची वाटचाल एड्स संपविण्याचा  दिशेने"* हे यावर्षीचे घोषवाक्य आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
        या रॅलीच्या माध्यमातून वाशिम शहरातून एचआयव्ही /एड्स या विषयावर माहिती देऊन तसेच जनजागरण गीते व पथनाट्याच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे.
                  रॅलीची सूरूवात जिल्हा रुग्णालयातून होणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती.बुवनेश्वरी एस.  ह्या रॅलीला हिरवी झेंडी दाखविणार आहे.तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थितीसह  महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे.
             या रॅलीला जास्तीत जास्त महाविद्यालय,सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना तथा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी केले आहे.

रॅलीचा मार्ग - जिल्हा रुग्णालयापासून-अकोला नाका-पाटणी चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-बस स्टॅन्ड-जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे