मच्छीमारांसाठी घर-घर किसान क्रेडीट कार्ड**लाभार्थ्यांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा*मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
*मच्छीमारांसाठी घर-घर किसान क्रेडीट कार्ड*
*लाभार्थ्यांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा*
मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
वाशिम,दि.03 (जिमाका) केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभाग व मत्स्यव्यवसाय आयुक्त,मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हयात मच्छीमारांसाठी “घर-घर किसान क्रेडीट कार्ड” अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेच्या लाभासाठी जिल्हयातील सर्व मच्छीमार,खाजगी मत्स्यशेतकरी,मत्स्यव्यवसायाशी संबंधित इतर मत्स्यव्यवसायीक तसेच जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेतील सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांनी केसीसी मिळण्यासाठी एक फोटो,आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्ससह सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,पद्मश्याम इमारत, सिव्हील लाईन,वाशिम येथे तात्काळ संपर्क साधावा.या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मनोज जयस्वाल यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment