आधारभूत किंमत खरेदी योजना ऑनलाईन नोंदणी सुरू हमीभावाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
आधारभूत किंमत खरेदी योजना ऑनलाईन नोंदणी सुरू
हमीभावाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम,दि.२१ (जिमाका) केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांची ज्वारी,बाजरी व मका या पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता जिल्ह्यातील वाशिम, मानोरा,कारंजा,मालेगाव,मंगरूळपीर व रिसोड येथील खरेदी केंद्रावर ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या ज्वारी,बाजरी व मका या पिकांचा हमीभाव पुढीलप्रमाणे आहे.ज्वारी हायब्रीड ३१८० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी मालदांडी ३२२५ रुपये,मका २०९० रुपये,बाजरी २५०० रूपये असा हमीभाव प्रति क्विंटल याप्रमाणे आहे.
शासनाने भरड धान्याचे हमीभावानुसार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर करण्याकरिता शेतकऱ्यांचा सातबारा ज्वारी,मका व बाजरीची नोंद असलेला सातबारा,आधार लिंक असलेल्या बँकेचे खाते क्रमांक व आधारकार्डची झेरॉक्स,मोबाईल नंबर तसेच ऑनलाइन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांचा स्वतःचा फोटो घेणे बंधनकारक आहे.
पेमेंट प्रणाली पी.एफ.एम.एस. असून आधार लिंक असलेले बँक खाते घेण्यात यावे.जॉइंट बँक खाते घेण्यात येणार नाही.तरी जिल्ह्यातील ज्वारी,मका व बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.
Comments
Post a Comment