पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना**8 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले*
*पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना*
*8 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले*
वाशिम,दि.10 (जिमाका) ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत,त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/ शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रीया अधिक पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चारवर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू आहे.
सन 2021-22 या वर्षापासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.यामध्ये एखाद्या योजनेकरीता लाभार्थ्याने अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये.यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे,1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2023-24 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालक/शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळाचा वापर करावा. अँड्रॉईड मोबाईल ॲप्लीकेशन नाव AH.MAHBMS गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल ॲपवर आहे. अर्ज करण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील वरील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले आहे. अर्जामधील माहिती कमित कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
*******
Comments
Post a Comment