२६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा
२६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा
वाशिम दि.२६ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम आणि सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, वाशिम,यांचे संयुक्त वतीने आज २६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
भारतीय संविधानाबाबत जनजागृती अणि सर्व नागरीकाना संविधानाची ओळख व्हावी याकरीता २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
यानिमित्ताने प्रभातफेरी काढण्यात आली.यामध्ये होमगार्ड,मागासवर्गीय मुला/मुलीचे शासकीय वसतिगृह वाशिम,नर्सिग कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थीनी व अन्य मान्यवरांनी सहभागी होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास हार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संविधान दिनानिमित्त भारताचे संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.पी पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.ए.टेकवाणी,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ व सामाजिक कार्यकर्ते पी.एस.खंडारे यांनी हिरवा झेंडा दाखविला.
प्रभातफेरीत शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच विद्यालय व महाविद्यालयातील तसेच नर्सिग कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थीनी, समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होते.
ही प्रभातफेरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस अभिवादन व पुष्पहार अर्पण करून संविधान प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, वाशिम कार्यालयात संविधान दिनानिमित्त भारताचे संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.त्यानंतर मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह वशिम येथे सविधान दिनानिमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाकरीता सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय वसतिगृहातील गृहपाल,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थीनी,ब्रिक्स प्रा.लि.पुणे व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment