30 नोव्हेंबरपर्यंत जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे
30 नोव्हेंबरपर्यंत जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे
वाशिम,दि.28 (जिमाका) अनुसूचित जमातीच्या इयत्ता 11 वी व 12 वीत शिक्षण घेत असलेल्या व पुढे व्यावसायीक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने समितीला 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे.वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अचूक अर्ज ई-मेल आयडी,भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) नमूद करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, यवतमाळचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment