२८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव क्रीडा व कृषी विभागाचा पुढाकार २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले


२८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

क्रीडा व कृषी विभागाचा पुढाकार

२४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

वाशिम,दि.१७ (जिमाका) जिल्हा क्रीडा परिषद वाशिम,जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
         
संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष अंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषीत केले आहे.या अनुषंगाने 
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन वाटाणे लॉन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 
       
युवा महोत्सवात १) तृण धान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर २) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना आहे.या संकल्पनेवर आधारीत स्पर्धात्मक व अस्पर्धात्मक जिल्हास्तरीय युवा
महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवा महोत्सवामध्ये आयोजीत होणाऱ्या विवीध बाबी १) लोकगीत (सहभागी संख्या १०),२) लोकनृत्य (सहभागी संख्या १०),३)वैयक्तिक सोलो लोकगीत (सहभाग संख्या ५), ४) वैयक्तिक सोलो लोकनृत्य (
सहभागी संख्या ५),५) कथालेखन (भाषा:- मराठी, हिंदी व इंग्रजी, १००० शब्दात), ६) फोटोग्राफी ७) पोस्टर स्पर्धा ८) वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) ९) संकल्पना आधारीत स्पर्धा (नाटय पथनाट्य,एकांकीका,रांगोळी पाककला) १०) युवाकृती (हस्तकला, वस्त्रोद्योग व अग्रो प्रोडक्ट) या ८ बाबीचा समावेश करण्यात येणार आहे.
    
युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. वयोमर्यादा १५ ते २९ वर्षापर्यंत असावे.(दि. ०१ एप्रिल २०२३). स्पर्धक हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.प्रवेश अर्ज सादर करतांना संस्थेने/मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज,विहित नमुन्यातील ओळखपत्र (इंग्रजी मधील),आधारकार्ड व जन्म तारखेचा दाखला असणे आवश्यक आहे.ओळखपत्रावर स्पर्धकाची बाब स्पष्टपणे नमुद असावी.स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासनाद्वारे १ लक्ष रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे पारितोषीक देण्यात येणार आहे.
        
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करण्याऱ्या युवक युवती यांची विभागास्तरावर निवड
करण्यात येईल.विभागस्तारावर प्राविण्य प्राप्त युवक युवती यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवाकरीता करण्यात येईल. फोटोग्राफी,पोस्टर,कथालेखन, पाककला व रांगोळी या स्पर्धा २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थेने /मंडळाने /वैयक्तीक आपले प्रवेश अर्ज २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिम येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.अधिक माहिती व नियमावलीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिव्हिल लाईन रोड,वाशिम येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी.युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे