महाकृषि ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना *सौर कृषि पंपासाठी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रृटीची पुर्तता करा*महाऊर्जाचे आवाहन
महाकृषि ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना
*सौर कृषि पंपासाठी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रृटीची पुर्तता करा*
महाऊर्जाचे आवाहन
वाशिम,दि.03 (जिमाका) महाकृषि ऊर्जा अभियानाच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर २१ हजार ४१४ अर्ज प्राप्त झाले आहे. प्राप्त अर्जापैकी १०२४ अर्जदार शेतकऱ्यांच्या अर्जात कागदपत्रांची त्रृटी आल्या आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित त्रृटीयुक्त यादीत आहे. याबाबत सर्व अर्जदार लाभार्थ्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्याकरीता कुसूम पोर्टलवरुन त्यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएसव्दारे व भ्रमणध्वनी करुन कळविण्यात आले आहे. तरीही अद्यापपर्यंत अर्जदारांकडून त्रृटींची पूर्तता करण्यात आली नाही. तरी सर्व त्रृटीयुक्त अर्ज असलेल्या लाभार्थ्यांनी ज्या संकेतस्थळावरुन या योजनेकरीता अर्ज केलेला आहे,त्याच संकेतस्थळावरील मार्गदर्शन सुचनेनूसार त्रृटीची पूर्तता करण्यात यावी.आवश्यकता असल्यास महाऊर्जा,कार्यालय यवतमाळ येथील कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 07232-241150 यावर संपर्क करून आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रृटीबाबत विचारणा करावी.असे महाऊर्जाचे प्रकल्प कार्यकारी अधिकारी दिनेश सुरोशे यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment