राज्यसेवा गट क परिक्षा परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबरला मनाई आदेश
राज्यसेवा गट क परिक्षा
परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबरला मनाई आदेश
वाशिम,दि.२२ (जिमाका) महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परिक्षा-२०२३ च्या विविध संवर्गाची ऑनलाईन परीक्षा वाशिम शहरातील डिजीटल परीक्षा परिसर,गुलाटी टॉवर,शासकीय तंत्रनिकेतन समोर, लाखाळा,रिसोड रोड,वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर १०० मीटरच्या परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधीचे गैरप्रकार घडु नये म्हणुन फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ लागु करणेबाबत जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परिक्षा-२०२३ अनुषंगाने २४ नोव्हेंबर रोजी परीक्षा केंद्राच्या १०० मिटरचे परिक्षेत्रामध्ये कलम १४४ लागू करून मनाई आदेश पारीत केले आहे. त्यामुळे पुढील बाबीस मनाई करण्यात येत आहे.
परीक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.परीक्षा केंद्राचे १०० मिटर परीक्षेत्रात आयोगाकडून नियुक्त केलेले अधिकारी/ कर्मचारी/परीक्षार्थी/परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी सोडुन इतर इसमांना प्रवेशास मनाई राहील.परीक्षा केंद्रावर १०० मिटरचे आत रस्त्यावरून वाहने नेण्यास मनाई राहील.परीक्षा केंद्राचे १०० मिटरचे परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/ एस.टी.डी./आय.एस.डी./ झेरॉक्स/फॅक्स/ई-मेल/ध्वनीक्षेपके इत्यादी सुविधावर प्रतिबंध घालण्यात येत आहे.
परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन / वायरलेस सेट/रेडिओ / दुरदर्शन/कॅलक्युलेटर/संगणक वापरण्यास बंदी आहे.परीक्षा केंद्राचे परीसरात प्रवेश करतेवेळी चारपेक्षा जास्त व्यक्ती प्रवेश करणार नाही.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. हा आदेश २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत लागु राहील. असे आदेशात नमूद केले आहे.
Comments
Post a Comment