२९ नोव्हेंबर रोजी उपयोगी वस्तुंचे विक्री व प्रदर्शन*लाभ घेण्याचे क्रीडा व कृषी विभागाचे आवाहन


*२९ नोव्हेंबर रोजी उपयोगी वस्तुंचे विक्री व प्रदर्शन*

लाभ घेण्याचे क्रीडा व कृषी विभागाचे आवाहन


वाशिम,दि.२४ (जिमाका) जिल्हा क्रीडा परिषद वाशिम,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने  २८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा व कृषी विभागामार्फत २९ नोव्हेंबर रोजी भव्य सांस्कृतीक युवा महोत्सवाचे वाटाणे लॉन व क्रीडा संकुल वाशिम येथे आयोजन करण्यात येणार आहे.युवकांच्या सुप्त गुणांना चालना मिळण्याकरीता सांस्कृतीक युवा महोत्सवाअंतर्गत वाटाणे लॉन येथे २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकगीत (सहभागी संख्या १०), लोकनृत्य (सहभागी संख्या १०), वैयक्तिक सोलो लोकगीत (सहभाग संख्या ५),वैयक्तिक सोलो लोकनृत्य
(सहभागी संख्या ५),वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी),संकल्पनेवर आधारीत स्पर्धा (नाटय/ पथनाट्य, एकांकीका) युवाकृती (हस्तकला, वस्त्रोद्योग व अग्रो प्रोडक्ट) हया स्पर्धा होतील. 

२८ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे फोटोग्राफी कथालेखन (भाषा:- मराठी, हिंदी व इंग्रजी, १००० शब्दात),पोस्टर स्पर्धा, रांगोळी, पाककला) इत्यादी बांबीचा समावेश करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे अटी व शर्ती :-  वयोमर्यादा १५ ते २९ वर्षापर्यंत असावे.
(दि. ०१ एप्रिल २०२३),स्पर्धक हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. प्रवेश अर्ज सादर करतांना संस्थेने/ मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज,विहित नमुन्यातील ओळखपत्र (इंग्रजी मधील),आधारकार्ड व जन्म तारखेचा दाखला असणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर स्पर्धकाची बाब स्पष्टपणे नमुद असावी. युवक-युवतींनी आपला प्रवेश विविध बाबीमध्ये निश्चित करावा. 
      
युवा महोत्सवामध्ये जिल्हयातील विविध शासकिय विभागाच्या वतीने पुर्वील्या जाणाऱ्या सुविधा, स्वंयमरोजगार योजना,उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम,जिल्हा उद्योग कर्ज योजना,पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना,खादी ग्राम उद्योग मंडळ व खादी ग्राम उद्योग आयोग याच्या मार्फत नविन्यपूण्र प्रकल्पाकरीता अर्थसहाय योजना त्याचप्रमाणे युवकांना कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषी नव तंत्रज्ञानाची ओळख या बाबतचे भव्य प्रदर्शन तसेच तृण धान्य/ भरड धान्यापासून बनविण्यात आलेले नाविन्यपुर्ण खाद्य प्रकार प्रदर्शनात राहणार आहे.ग्राहकांना महिला बचत गटानी बनविलेल्या उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन मिळतील.रासायनीक रंग विरहीत कुठल्याही प्रकारचे भेसळ नसलेले चविष्ट आणि आकर्षक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार. सर्व डाळी,मसाला,चटणी,हळद, कुरडया,पापड,मातीचे दिवे इत्यादी वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.या सर्व बाबींचा लाभ घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी जिल्ह्यातील नागरीक,महिला वर्ग, युवक-युवतींना २९ नोव्हेंबर रोजी वाटाणे लॉन येथे सदर प्रदर्शनाला भेट दयावी असे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे