विश्वकर्मा योजना मास्टर ट्रेनर्ससाठी नोंदणी करा





विश्वकर्मा योजना मास्टर ट्रेनर्ससाठी नोंदणी करा

        वाशिम, दि. 02 (जिमाका)  केंद्र शासनाने देशातील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यात मिस्त्री/गवंडी, शिंपी, सुतार, न्हावी, लोहार, चर्मकार, कुंभार, धोबी, सोनार, हॅमर ॲन्ड टुलकिट मेकर, माळी तयार करणारा, बास्केट मेकर/टोपली तयार करणारा/चटई तयार कराणारा, डॉल अॅन्ड टॉय मेकर बाहूल्या व खेळणी तयार करणे, मासे पकडण्याचे जाळे बनविणारे, शिल्पकार-दगड कोरणारे/दगड तोडणारे, चिलखत बनविणारा, कुलपे तयार करणे व दुरुस्ती व जहाज,बोट तयार करणारे अशा एकुण अठरा ट्रेडसाठी प्रशिक्षण देण्याकरीता मास्टर ट्रेनरची अर्थात प्रशिक्षकाची आवश्यकता आहे.

           संबंधीत ट्रेडची माहीती असलेल्या व कमीत कमी 20 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तींनी नोंदणी करण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7775814153, 9850983335, 7875798664 किंवा कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे