*झाकलवाडीत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात*


*झाकलवाडीत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात*
     
वाशिम,दि.08 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ,वाशिम यांच्या वतीने आज 8 नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथे विधी सेवा सप्ताहानिमित्ताने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. 
यावेळी श्री. टेकवाणी यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे मिळणाऱ्या मोफत विधी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी प्रास्ताविकातून वैकल्पीक वाद निवारण केंद्राचे फायदे या विषयावर ॲड. जी.व्ही मोरे यांनी नागरीकांचे मुलभूत कर्तव्य या विषयावर व सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड. हेमंत इंगोले यांनी औषधीचे दुरुपयोग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला झाकलवाडी येथील माजी सरपंच बाबुराव काळबांडे व ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जगदिश गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.श्री.कढणे यांनी मानले.
                      *******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर