तोंडगांव येथे जनजागृती कार्यक्रमातून दिली कायदेविषयक माहिती*


*तोंडगांव येथे जनजागृती कार्यक्रमातून दिली कायदेविषयक माहिती* 

वाशिम,दि.10 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्री विधी सेवा दिनाच्या अनुषंगाने वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. यावेळी तोंडगांवचे उपसरपंच गजानन गोटे, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. परमेश्वर शेळके, सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड. शुभांगी खडसे, जिल्हा विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव तिफणे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. मोहन देशमुख, ॲड. जी. व्ही. मोरे व ॲड. सतिष सुर्वे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
              यावेळी श्री. टेकवाणी यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती देवून 9 डिसेंबर रोजी जिल्हयात सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोक अदालतीचे जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे मध्यस्थीने मिटवावी. लोक अदालतीतील प्रकरणे मिटल्यामुळे दोन्ही पक्षाचा विजय होतो असे सांगून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मिळणाऱ्या मोफत विधी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 
             श्री.शेळके यांनी प्रास्ताविकातून सायबर सुरक्षा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ॲड. मोरे यांनी ज्येष्ठ नागरीकांचे कायदे व शासकीय योजनांची माहिती दिली. ॲड. श्रीमती खडसे यांनी महिलांचे कायदे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
          कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी,लोक अभिरक्षक कार्यालयातील कर्मचारी, विधी स्वयंसेवक, पोलीस कर्मचारी व तोंडगांव येथील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार विठ्ठल गोटे यांनी मानले.
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे