मतदार यादी निरीक्षकांची राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक

मतदार यादी निरीक्षकांची 
राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक 

वाशिम दि.३०(जिमाका) मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी आज ३० नोव्हेंबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुधीर कवर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानजोडे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ.श्रीमती पाण्डेय म्हणाल्या,मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.त्यामध्ये मतदाराच्या नावाचा समावेश करायचा असेल किंवा नाव वगळायचे असेल त्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.राजकीय पक्षांनी त्यांच्या मतदान केंद्र प्रतिनिधींची यादी वेळेत उपलब्ध करून द्यावी.मतदारांच्या काही निवडणूकविषयक तक्रारी असतील त्या तत्परतेने सोडविल्या जातील.मतदार निवडणूकविषयक तक्रारी १९५० या टोल फ्री क्रमांकावर नोंदविता येतील.शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचे नाव असतात. कोणत्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव पाहीजे हे मतदाराला विचारणा करून तेथील यादीत नाव ठेवावे.ज्या कुटूंबामध्ये १० व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आहे, अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी.असे त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,जिल्ह्यात मतदारांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे.१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवावर्गाने मतदार म्हणून नाव नोंदणी केली पाहिजे,यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून १३ हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले आहे.एकही महिला मतदार ओळखपत्र व मतदानापासून वंचित राहणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी घेण्यात येत आहे.२६ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणीसाठी नवमतदारांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे.घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.मतदार ओळखपत्र वाटप करण्यात येत आहे.१०३१ वारंगणा व १४ तृतीयपंथीयांची घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करण्यात आल्याची माहिती श्रीमती बुवनेश्वरी यांनी दिली.  

उपस्थित सर्व राजकीय पक्षाने मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

 सभेला वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,तहसीलदार निलेश पळसकर (वाशिम), कुणाल झाल्टे (कारंजा), शितल बंडगर (मंगरूळपीर) प्रतीक्षा तेजनकर (रिसोड) दीपक पुंडे (मालेगाव) रवी राठोड (मानोरा) तसेच काँग्रेस पक्षाचे गजानन गोटे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माणिकराव देशमुख, रामदास मते,गजानन भादुर्गे,प्रतीक कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे