कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम*


*20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर*
*कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम*

वाशिम,दि.10 (जिमाका)  समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा लवकरात लवकर शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान जिल्हयात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.
        या शोध मोहिमेच्या अनुषंगाने आज 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. याच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात सभा घेण्यात आली.या सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, प्रभारी कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ. परभणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांची देखील तपासणी करावी. विद्यार्थ्यांना कुष्ठरोग आणि क्षयरोग या याबाबतची माहिती देवून त्यांच्यामध्ये जागृती करावी. विद्यार्थ्यांमध्ये जर संशयीत रुग्ण आढळून आल्यास त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात काळजीपूर्वक तपासणी करावी. कुष्ठरुग्ण आणि सक्रीय क्षयरुग्णाचा शोध घेतांना आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात यावे. या मोहिमेदरम्यान आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढण्याची मोहिम देखील राबविण्यात यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
        ही मोहिम जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आल्या आहे. आशा सेविका आणि पुरुष स्वयंसेवक तसेच विविध स्तरावरील पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याची माहिती डॉ. परभणकर यांनी दिली. 
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे