जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2023-24*इच्छुकांनी 28 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी*



जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2023-24

*इच्छुकांनी 28 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी*
      
वाशिम, दि. 08 (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा कृषि अधिकारी, वाशिम यांच्या संयुक्त वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2023-24 चे आयोजन 30 नोव्हेंबर रोजी बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे करण्यात येत आहे. 

युवा महोत्सव म्हणजे युवकांना आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ आहे. यामध्ये युवकांचा सर्वांगीण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, युवकांना तृणधान्याचे महत्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाय या सोबतच शेती या व्यवसायाशी युवकांची ओळख करुन देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्व युवकाना पटवुन देणे इत्यादी बाबींवर युवा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
         
संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ घोषित केले आहे. युवकांना तृणधान्याचे महत्त्व पटवुन देवून विज्ञानाच्या आधारे तृणधान्य उत्पादन वाढीसाठी करावायाच्या उपाययोजनांवर निबंध स्पर्धासुध्दा घेण्यात येणार आहे. तृणधान्य उत्पादनवाढ या संकल्पनेवर विविध प्रदर्शन युवांसाठी रोजगार व व्यवसाय संधी, यशोगाधा, पर्यावरण, संरक्षण, भौगोलिक परिस्थीतीवर आधारीत उत्पादन वाढीसाठी उपाययोजना, समस्यांचे निराकरण, संशोधने, देश-विदेशात तृणधान्य आयात-निर्यात याबाबत माहिती, विविध योजनांची माहिती, पाककला, इत्यादी बाबत युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांमार्फत तयार करण्यात आलेले हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रोडक्ट, इत्यादी वस्तुंचे प्रदर्शनसुध्दा ठेवण्यात येणार आहे. युवा महोत्सवात पुढील प्रकारच्या कला प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कला प्रकार - समुह लोकनृत्य (सहभाग संख्या १०), वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या ५), लोकगीत (सहभाग संख्या १०), वैयक्तिक सोलो लोकगीत (सहभाग संख्या ५). कौशल्य विकास- कथा लेखन (सहभाग संख्या ३), पोस्टर स्पर्धा (सहभाग संख्या २), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या २), फोटोग्राफी (सहभाग संख्या २). संकल्पना आधारीत स्पर्धा - महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर (सहभाग संख्या ३५), सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (सहभाग संख्या ५). युवा कृती- हस्तकला (सहभाग संख्या ७), वस्त्रोद्योग (सहभाग संख्या ७), अॅग्रो प्रोडक्ट (सहभाग ७), इत्यादी कलाकृतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
         
युवा महोत्सवामध्ये जिल्हयातील १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. त्यांचे वय १ एप्रिल २०२३ रोजी परिगणना करण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, इत्यादी संस्थेतील युवक व युवतींना सहभागासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकाराकरीता विजय स्पर्धकांना आकर्षक रोख पारीतोषिक व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.तरी जिल्हायातील वरील कला प्रकारामध्ये इच्छुक असणाऱ्या युवक व युवतींनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत नोंदवावे.अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे (8888366372), क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे (9881071770) यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता व जिल्हा कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी कळविले आहे.
                    *******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर