सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले


सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप

३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले 

वाशिम,दि.२३ (जिमाका) राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते. 
               जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाला कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ पुरविण्याची मागणी आली आहे.प्राचार्य,शासकीय तंत्रनिकेतन वाशिम तथा सदस्य सचिव अल्पसंख्यांक वसतिगृह व्यवस्थापन समिती येथील सफाई कामगार १, सफाईगार महिला २, सुरक्षा रक्षक महिला गार्ड २ पदे,दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर मंगरूळपीर येथील सफाईगार १ पद,दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मानोरा येथील सफाईगार १ पद, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगरूळपीर येथील सफाईगार १ पद, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा मंगरूळपीर येथील सफाईगार १ पद  व अशा विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे. 

जिल्ह्यातील इच्छुक व पात्र जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटींनी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत खोली क्र. ११, काटा रोड, वाशिम येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त  प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

बेरोजगारांनी स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी ही सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच ही संस्था कार्यरत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक,सहाय्यक उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेतील सदस्य क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थेचा आर्थिक वर्ष २०२२-२३ चा लेखा परिक्षण अहवाल सादर करावा. सुशिक्षित बेरोजगार संस्थेची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. बेरोजगार सेवा सोसायटी संबंधात वेळोवेळी निर्गमीत झालेले शासन निर्णय विचारात घेण्यात येतील. 

सुशिक्षित बेरोजगार संस्थेला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अर्बन को-ऑप. बँकेत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या सदस्यांचे सेवायोजना कार्ड चालू स्थितीत असणे आवश्यक आहे.याबाबत संस्थेला काही अडचणी असल्यास अथवा अधिक माहितीसाठी संबंधितांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र येथे येवून मार्गदर्शन घ्यावे,सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश