महिला बचताच्या प्रदर्शनीला आमदार किरण सरनाईक यांची भेट
- Get link
- X
- Other Apps
महिला बचताच्या प्रदर्शनीला आमदार किरण सरनाईक यांची भेट
वाशिम (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत शहरातील विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे आयोजित महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनीला अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनी आज भेट दिली.
मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम यांच्या अंतर्गत या प्रदर्शनीचे २३ फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या भेटीवेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थित होते.
आमदार किरण सरनाईक म्हणाले की, महिला ही संसाराचा गाडा वाहत असताना घराबाहेर पडून एक यशस्वी उद्योजिका होत आहे. माविम व सीएमआरसीच्या माध्यमातून महिलांना वेळोवेळी विविध प्रकारचे उद्योजकीय प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याकरिता हक्काचे ठिकाण उपलब्ध होत आहे. तसेच विविध बँकेसोबत सामंजस्य करार करून तळागाळातील महिला उद्योग उभारणी करत आहे. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश नागपुरे यांनी करुन महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माविमचा सहायक सहनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे, माविमच्या जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच लोकसंचालित साधन केंद्र वाशिमचे व्यवस्थापक संतोष मुखमाले, लोकसंचालित साधन केंद्र कळंबा महालीचे व्यवस्थापक प्रमोद गोरे, लोकसंचालित साधन केंद्र अनसिंगच्या व्यवस्थापक संगीता शेळके, सीएमआरसीचे लेखापाल विनय पडघान, प्रदीप देवकर, सीमा पाचपिल्ले, उपजीविका सल्लागार नंदकिशोर राठोड, अरुण सुर्वे व जिल्ह्यातील सर्व सीएमआरसीचे सहयोगांनी व सीआरपी उपस्थित होते. या तालुकास्तरीय प्रदर्शनीला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी व बचत गटामार्फत निर्मित वस्तूंचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
००००
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment