वाशिम महासंस्कृती महोत्सवाचा समारोप*गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी वाशिमकर मंत्रमुग्ध*

वाशिम महासंस्कृती महोत्सवाचा समारोप

*गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी वाशिमकर मंत्रमुग्ध*

वाशिम दि.१(जिमाका) गझलेला उपशास्त्रीय संगीताचा दर्जा मिळवून देण्याचे श्रेय असलेले गझलकार भीमराव पांचाळे यांनी वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित गझल कार्यक्रमातून उपस्थित वाशिमकरांना मंत्रमुक्त केले. त्यांच्या सोबतीला कन्या डॉ.भाग्यश्री पांचाळे - गायकवाड यांनी सुद्धा सुरेख गझल सादर करून रसिकांच्या टाळ्या घेतल्या. किशोर बळी यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.
              गझल मैफिलीच्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व ललित वऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थित होती.
            भीमराव पांचाळे गझलेबाबत बोलतांना म्हणाले,दोन भाषांच्या ओळी अशा मिसळून जातात की, जाणवत नाही की ह्या दोन भाषा होत्या.त्यामध्ये एक उर्दू तर एक मराठीची. गजलेतून ते म्हणतात " ए सनम आखो मे मेल खूबसुरत, निपजता हु माँ से,मौसी मुस्कुराती है "     
            अमीर खुसरो हा एक हजार वर्षांपूर्वी भारताला मिळालेला एक प्रसिद्ध शायर होता.त्याने कवितेचे अनेक प्रकार शोधून काढले.तीन ओळीची कविता देखील त्यांनीच निर्माण केली.अकराशे वर्षानंतर तो प्रयोग ईलाही जमादार यांनी मराठी भाषेत केला.तो द्वैभाषिक गझलेचा.    
            भीमराव पांचाळे गझलेतून म्हणतात," है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर,लावण्या तू दीप येथे काळजाची वाट कर,रासते मे लोग काटे दर बिछाते है यहा, फुलही उधडेल कोणी चालण्या सुरुवात, ए सनम आखो को मेरी खूबसूरत साज है, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे."
       आणखी एक गझल सादर करताना पांचाळे म्हणतात," हवे ते मिळेना,नको ती मिळे, तुला काय मागू, मला ना कळे, कुणी टाकले तेल आगीत या, इथे मी जळे इथे तिथे ती जळे,मज नको हे गगन, ही धरा दे मनाचा रिता कोपरा. हिंडलो सौख्य शोधीत मी,माझ्या घरी सुखांचा जेव्हा जमाव झाला अन मी मुक्या घराचा तेव्हा लीलाव झाला, हिंडलो मी सौख्य शोधित मी,भेटला आसवांचा झरा " या गझलेला श्रोत्यांनी दाद दिली.
     डॉ.भाग्यश्री पांचाळ यांनी नित्यानंद हाडके यांची रचना गायली.
 " करते थोडी स्वप्ने गोळा,स्वप्नांचे वय कायम सोळा, तुलाच माझा श्वास समजले, अन जगण्याची आस समजले, तू फुलांचा घोस माझा,तो सुगंधी श्वास माझा, मी गळा द्यावा खुशीने...... " अशा प्रकारच्या अन रचना गझलेतून सादर करून उपस्थितांची दादा मिळविली.कार्यक्रम असंख्य श्रोत्यांनी गर्दी केली होती.
           २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित महासंस्कृती महोत्सवाची सांगता गझल कार्यक्रमाने झाली.चार दिवशीय या महोत्सवात जिल्ह्यातील लोककलावंतांनी पारंपरिक लोककला सादर करून जुन्या लोककलांची जपवणूक केली.त्यानिमित्ताने नव्या पिढीला महाराष्ट्राच्या लोककलांची ओळख झाली.तसेच जिल्ह्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देखिल सांस्कृतिक कार्यक्रम व लोककलांचे सादरीकरण करून प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश