कामगारांचे कायदे, योजनांबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते उद्घाटन ; जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
कामगारांचे कायदे, योजनांबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते उद्घाटन ; जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
वाशिम, दि. ८ (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधिज्ञ संघ व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कामगारांचे कायदे व योजनेची माहिती तसेच नालसा हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १५१०० याबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश एन.आर. प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस ह्या देखील उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले व कायदेविषयक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला संपर्क साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी केले.
मुख्य लोक अभिरक्षक अॅड. परमेश्वर शेळके, सहायक लोक अभिरक्षक अॅड. अतुल पंचवटकर यांनी कामगारांचे कायदे व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शासकीय कामगार अधिकारी आशिष राठोड व नोंदणी अधिकारी किरण टी राठोड यांनी कामगारांच्या योजना या विषयावर कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अनुप बाकलीवाल तसेच अॅड. जी. व्ही. मोरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, विधिज्ञ, सर्व लोक अभिरक्षक, विधिज्ञ संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय कामगार अधिकारी कार्यालय, नोंदणी अधिकारी कार्यालय येथील कर्मचारी, विधि स्वयंसेवक व असंघटीत कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक लोक अभिरक्षक अॅड राहुल पुरोहित यांनी केले तर आभार सहायक लोक अभिरक्षक शुभांगी खडसे यांनी मानले.
००००
Comments
Post a Comment