जाणता राजा ’ महानाटय प्रवेशिकेसाठी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा
- Get link
- X
- Other Apps
‘ जाणता राजा ’ महानाटय
प्रवेशिकेसाठी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा
वाशिम, दि. ०५ (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात २ जून २०२३ ते ६ जून २०२४ या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. वाशिम येथे १०,११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे " जाणता राजा " हे महानाटय सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे.
‘जाणता राजा’ या महानाटयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चारित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती सर्वसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार “जाणता राजा” या महानाटयाच्या माध्यमातून जनमानसात पोहचविण्यात येणार आहे.
१०,११ व १२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता महानाटयाला सुरुवात होणार आहे. हे महानाटय सलग ३ तास १० मिनिटांचे आहे. ८ हजार २०० प्रेक्षक क्षमता प्रत्येक प्रयोगाची आहे. तीनही दिवसांचे महानाटयाचे प्रयोग मोफत आहे. मात्र प्रेक्षकांकडे महानाटय बघण्याकरीता प्रवेशिका असणे अनिवार्य राहणार आहे. मोफत प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालय येथे या प्रवेशिका उपलब्ध होतील. विविध संघटनांनी महानाटय प्रयोग बघण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुक्याच्या विविध संघटनांनी मोफत प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा. प्रवेशिका असल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment