विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन १२ फेब्रुवारी रोजी
- Get link
- X
- Other Apps
विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन
१२ फेब्रुवारी रोजी
वाशिम, दि. ७ (जिमाका ) : अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन दि १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार विभागीय लोकशाही दिन तसेच महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
त्या अनुषंगाने नागरिक व महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज तालुका, जिल्हा, महानगरपालीका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.
तसेच तक्रार ही degamaravati@gmail.com आणि deg_amaravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी नागरिकांना केले आहे.
****
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment