अनाथ बालकांसाठी पंधरवाड्याचे आयोजन


अनाथ बालकांसाठी पंधरवाड्याचे आयोजन

वाशिम,(जिमाका) : अनाथ मुलांना आधार कार्ड, राशन कार्ड, जातीचे दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीय प्रमाणपत्र, डोमीशीयल व नॅशनलिटी, मतदान कार्ड, ई. उपलब्ध करून देण्याकरीता २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीमध्ये शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनाथ बालकांनी सेवा योजनाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कक्ष क्र.२०४ जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका हरिश्चंद्र गवळी यांनी केले आहे.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश