कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ६ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात
६ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम,(जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे यासाठी ६ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जारी केले आहे.
जिल्ह्यात आजपासून इयत्ता १२ वीची परीक्षा सुरु झाली आहे. दि.२४ फेब्रुवारी रोजी श्री अवलिया महाराज संस्थान काळामाथा ता. मालेगाव येथे मुख्य यात्रा, दि.२५ फेब्रुवारी रोजी श्री बिरबलनाथ महाराज मंगरुळपीर येथे मुख्य यात्रा, दि.३ मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव संपूर्ण जिल्ह्यात साजरा
करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत राज्यात व जिल्हयात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, राज्य कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करणे व इतर मागणी संदर्भात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष,संघटना ,सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्यासाठी धरणे आंदोलने,उपोषणे करण्यात येत आहेत. जिल्हा हा सण-उत्सवाचे दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे.
प्रतिबंधात्मक कालावधीत कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुरे, लाठया किंवा काठया तसेच शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तिक्ष्ण वस्तु जवळ बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे,दगड किंवा क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा तशी साधणं जवळ
बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,व्यक्तींचे प्रेते किंवा मनुष्यकृतीच्या प्रतिमा, आकृत्या यांचे बिभत्स प्रदर्शन करणे,
वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहिरपणे प्रक्षोभक घोषणा करणे अशा प्राधिकारांच्या मते ज्यामुळे नागरी सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता
धोक्यात येईल किंवा ज्या कृतीमध्ये राज्य प्रशासन उलथून पाडण्याची प्रवृत्ती दिसून येईल असे आवेशपूर्ण भाषणे ,सोंग आणणे, पत्ते खेळणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलके, किंवा कोणत्याही जिन्नस ,वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार,प्रचार करणे, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश कामावरील पोलिस अधिकारी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह , अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
००००
Comments
Post a Comment