जाणता राजा ’ महानाटय* *वाशिम येथे १०, ११ व १२ फेब्रुवारीला
‘ जाणता राजा ’ महानाटय
वाशिम येथे १०, ११ व १२ फेब्रुवारीला
वाशिम,दि.०१ (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात राज्यात २ जून २०२३ ते ६ जून २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.वाशिम येथे याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने १०,११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे " जाणता राजा " महानाटय सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारी रोजी वाकाटक सभागृहात महानाटयाच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न झाली. या सभेला समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, शिक्षणाधिकारी गजाजन डाबेराव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमती एन. ए.खान,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर.एस.घिनमिने, पोलीस विभागाचे अनिल भूजाडे,विधि अधिकारी महेश महामुने,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे जे.डी.काटे,जाणता राजा टिमचे आनंद जावडेकर व विजय पवार यांची प्रमख उपस्थिती होती.
‘जाणता राजा’ या महानाटयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची,नितीची, चारित्राची,विचारांची व कार्यकुशलतेची महती सर्वसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाटयाद्वारे जनमानसात पोहचविण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता महानाटयाला सुरुवात होणार आहे.सलग ३ तास १० मिनिटांचे हे महानाटय आहे. ८ हजार २०० प्रेक्षक क्षमता प्रत्येक प्रयोगाची राहणार आहे.तीनही दिवसांचे महानाटयाचे प्रयोग मोफत असून प्रेक्षकांकडे प्रवेशिका असणे अनिवार्य राहणार आहे.
Comments
Post a Comment