खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्ततालोक अभिरक्षक कार्यालयातुन आरोपीला मिळाली होती मोफत विधी सेवा
- Get link
- X
- Other Apps
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता
लोक अभिरक्षक कार्यालयातुन आरोपीला मिळाली होती मोफत विधी सेवा
वाशिम (जिमाका): येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत लोक अभिरक्षक कार्यालयाकडुन
मोफत विधी सेवा पुरविलेल्या आरोपी सुनिता संतोष कांबळे रा.हिंगणवाडी ता. कारंजा जि.वाशिम या तुरूंगबंदी आरोपीची जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगरूळपीर यांनी निर्दोष मुक्तता केली. दि. १६ जून २०२१ रोजी आरोपी सुनिता हिच्यावर तिचे पती संतोष कांबळे यांचा खुण केल्याचा
गुन्हा पो.स्टे. धनज येथे अप.क. १२८/२१ कलम ३०२,२०१ नुसार दाखल झाला होता व आरोपी हिला अटक करून घटनेच्या दिवसापासुन ती अडीच वर्ष जिल्हा कारागृह वाशिम येथे तुरूंगबंदी म्हणुन होती.
आरोपी सुनीता हिची आर्थिक परिस्थिती खाजगी वकील लावण्याची एैपत नव्हती त्यामुळे तीने जेल मधुन मोफत वकील मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा अंतर्गत असणाऱ्या लोक
अभिरक्षक कार्यालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. लोक अभिरक्षक कार्यालया मार्फत मुख्य लोक अभिरक्षक अॅड. परमेश्वर शेळके यांनी सदर प्रकरण उप मुख्य लोकअभिरक्षक अॅड. वर्षा रामटेके यांना वर्ग केले. सदर प्रकरणात अॅड. रामटेके यांनी सक्षमपने आरोपीचा यशस्वी
बचाव केला.
प्रस्तुत प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने ५ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. लोक अभिरक्षक कार्यालयाकडुन तुरंगबंदी, महिला, पिडीत, अनुसुचीत जाती जमातीचे लोक, आर्थिक दृष्या मागास व ३ लाख रूपये पर्यत उत्पन्न असलेल्या गरजु लोकांना लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा
पुरविण्यात येते. याचा फायदा घेऊन आरोपीने सदर प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम कडे मोफत विधी सेवेसाठी अर्ज केला होता त्यानुसार तीला मोफत विधी सेवा
पुरविण्यात आल्याची माहिती मुख्य लोकअभिरक्षक, वाशिम यांनी दिली.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment