पालकमंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा
पालकमंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा
वाशिम, (जिमाका) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड हे १५ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
अमरावतीमधील बेलोरा विमानतळ येथून हेलीकॉप्टरने पोहरादेवी येथे सकाळी ९.३० वाजता आगमन, ९.४० वाजता श्री.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण कार्यक्रमाला उपस्थिती, सकाळी १० वाजता पोहरादेवी/ उमरी सुरु असलेल्या शासनाच्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी व आढावा बैठक, संत सेवालाल महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. सकाळी ११ ते १२ पर्यंत राखीव. त्यानंतर दुपारी नेरकडे प्रयाण करतील.
०००
Comments
Post a Comment