वाशिमजवळील कोंडाळा येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन

वाशिमजवळील कोंडाळा येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन 

वाशिम(जिमाका) : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील ५५४ रेल्वे स्थानके आणि १५००  भुयारी पुलांचा पुनर्विकास करण्याच्या कामाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वाशीम जवळील कोंडाळा येथील गेट क्रमांक १११ जवळील भुयारी पुलाच्या विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोंडाळा येथील सरपंच शिल्पा वाठोरे, प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य नितेश मलिक, रेल्वे बोर्डाचे सदस्य महेंद्रसिंग गुलाटी, दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्यामलाल दसवाना, मुख्य वाणिज्य निरीक्षक कमलनयन मृणाल आदींची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाअंतर्गत अमृत भारत स्टेशन योजनेवर आधारित आयोजित चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
२००८ मध्ये ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले अकोला पुर्णा रेल्वे मार्गावरील कोंडाळा या गावाजवळ अंडरपास भुयारी मार्गाचे उद्घााटन झाल्याने वाशीम ते किन्हीराजा गावाला जाताना प्रवास सुखकर होणार आहे अशी समाधानकारक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

दरम्यान, आंकाक्षित वाशिम जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने रेल्वे बरोबरच विविध महत्वाकांक्षी योजना राबवून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे व अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी दिली. दरम्यान, वाशिम स्थानकावरून मुंबई, पुणे या महानगरांकडे जाण्यासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी विनंती जिल्हा परिषद सदस्य नितेश मलिक व शिवसेना जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांनी रेल्वे विभागाला केली. अकोला-पुर्णा रेल्वे मार्गावरील या भुयारी पुलामुळे परिसरातील गावांना जिल्हा मुख्यालयी पोचणे आता सुकर होणार असल्याने वाशिमकर नागरिकांना रेल्वे मंत्रालयाच्या आभार मानले.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश