वत्सगुल्म कृषी महोत्सवात १३ फेब्रुवारी रोजी रेशीम उद्योगावर व्याख्यान, चिया पिकांचे खरेदीदार विक्रेतांचे संमेलन
वत्सगुल्म कृषी महोत्सवात १३ फेब्रुवारी रोजी रेशीम उद्योगावर व्याख्यान, चिया पिकांचे खरेदीदार विक्रेतांचे संमेलन
वाशिम (जिमाका) : शहरातील बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल प्रांगण, काटा रोड येथे पाच दिवसीय वस्तगुल्म कृषी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रीतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी मंगळवारी (दि.१३) सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत रेशीम उद्योग व संधी या विषयावर जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांचे व्याख्यान, दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान आर्थिक साक्षरता या विषयावर जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा यांचे व्याख्यान, दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चिया पीकांचे खरेदीदार व विक्रेता संमेलन त्यानंतर सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यान, संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा नागरिक व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
००००
Comments
Post a Comment