समाज कल्याण आयुक्तालयाच्या एक दिवसीय मेळाव्यात आठ कर्ज प्रस्तावांना मंजुरी> बॅंकांमधील कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठीम ेळाव्याचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
समाज कल्याण आयुक्तालयाच्या एक दिवसीय मेळाव्यात आठ कर्ज प्रस्तावांना मंजुरी
> बॅंकांमधील कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी
मेळाव्याचे आयोजन
वाशिम,दि.८ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागांतर्गत येत असलेल्या विविध महामंडळाच्या कर्ज योजनेतील बॅंकस्तरावर प्रलंबित कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे नुकतेच एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बॅंकामधील प्रलंबित आठ कर्ज प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांच्या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांना मंजुरीसाठी पुरस्कृत केले आहेत. बँकस्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित असलेले हे कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बँक व्यवस्थापकांनी बँकांकडील विविध महामंडळाचे प्रलंबित प्रकरणे मार्च महिन्यापूर्वी निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
मेळाव्यादरम्यान आठ कर्ज प्रस्तावांना सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया, बॅंक ऑफ इंडीया यांनी मंजुरी प्रदान केली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आरसेटी संचालक धर्माजी बोईले, समाजकल्याण विभागाचे सारंग गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.
या मेळाव्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया अनसिंगचे शाखा व्यवस्थापक रमेश सावंत, वाशिमचे शाखा व्यवस्थापक मंगेश बोदडे, बँक ऑफ इंडीया वाशिमचे शाखा व्यवस्थापक अविनाश सरकटे,, बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक सागर हजारे, आयसीआयसीआयचे शाखा व्यवस्थापक गणेश चव्हाण, एचडीएफसी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक मंगेश कोल्हे, एडीसीसी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक श्री. सरनाईक, बॅंक ॲाफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक सुमीत धुमाळे तसेच महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत बँकांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणातील अर्जदार उपस्थित होते.
या मेळाव्यास विविध महामंडळाचे कर्मचारी प्रतिक माने, अनंतकुमार इंगोले, रविराज विद्यागर, हेमराज राठोड, प्रशांत आंबेकर, विजय तायडे, संतोष नांदनकर, संतोष चव्हाण, सारंग पुराणिक, अंकुश कांबळे, एकनाथ कांबळे, राहुल जाधव व किशोर हमाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग पुराणिक व आभार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी मानले.
०००
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment