सामाजिक न्याय दिनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
सामाजिक न्याय दिनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
वाशिम, (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधिज्ञ संघ,
वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना सामाजिक
न्याय दिनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये सहा. लोक अभिरक्षक अॅड. अतुल पंचवाटकर यांनी सामाजिक न्याय दिवस या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.
शुभांगी खडसे यांनी महिलांचे कायदे या विषयावर तर अॅड. हेमंत इंगोले यांनी आदिवासींच्या शेतजमीनीबाबत कायदे या विषयावर उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी,
लोक अभिरक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
आभार प्रांजय राठोड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांनी सहकार्य
केले.
०००
Comments
Post a Comment