संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी १० मार्चपर्यंत अर्जाची मुदत
- Get link
- X
- Other Apps
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी १० मार्चपर्यंत अर्जाची मुदत
वाशिम, (जिमाका) : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा समावेश होतो.
या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित नागरीकांनी २९ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करावे.या कालावधीत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.
विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सेतू संचालकांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे तहसिलदार,वाशिम यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment