जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात ३ मार्च रोजी महा लोकअदालतीचे आयोजन
जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात ३ मार्च रोजी महा लोकअदालतीचे आयोजन
वाशिम, (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पक्षकारांना होणाऱ्या कष्टासह त्यांचा वेळ व पैसा वाचवून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडी मार्फत निकाली काढणे हे या लोकअदालतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सर्व पक्षकारांनी महा लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.विजय टेकवाणी यांनी केले आहे.
०००
Comments
Post a Comment