महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
*महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
वाशिम,(जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव ॲानलाईन सादर करण्याचे आवाहन करणअयात आले आहे.
या महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी एनएसएफडीसी अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरु झालेल्या आहेत.
यात सुविधा कर्ज योजना, महिला समृध्दी योजना व शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव ॲानलाईन सादर करावे लागणार आहे. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना https://beta.slasdc/org या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर त्यांच्या तीन प्रती मुळ कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चिखली रोड, वाशिम जिल्हा कार्यालयास सादर कराव्यात.
हे कर्ज प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख ११ मार्चपर्यंत आहे. या योजनेस लागणारे कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा. अर्जदाराचा कुटुंब उत्पन्नाचा दाखला असावा. नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रत, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, आधार लिंक मोबाईल क्रमांक, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचे भाडे, पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, एनएसएफडीसी योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आरटीओकडील प्रवाशी वाहतूक परवाना आदी कागदपत्रे आवश्यक आहे.
वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंग किंवा किंमतीबाबत अधिकृत विक्रेता अथवा कंपनीचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला, व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल, खरेदी करावयाच्या मालाचे किंवा साहित्याचे कोटेशन, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर यापूर्वी महामंडळाच्या योजनेचा व अन्य शासकीय योजनेचा लाभ घेलेला नसल्याचे प्रतिज्ञा पत्र, उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसन्स तसेच कर्ज मंजुरीनंतर कर्ज परतफेडीच्या हमीसाठी दोन सक्षम जामीनदार घेण्यात येईल. अर्जदाराचे सिबील स्कोअर पाचशेच्यावर असावा.
अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे. कर्ज मंजुरीनंतर दोन सक्षम जामीनदाराच्या वैधानिक दस्तऐवजाची पूर्तता केल्यावरच कर्ज वाटप करण्यात येईल.
या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे एम गाभणे यांनी केले आहे.
००००
Comments
Post a Comment